लिखाणात संपादन किंवा तत्सम बदल असे करावेत ?
From Citypedia Thane
नवीन लेख लिहिताना संपादकीय व्याकरण कसे करावे किंवा जुन्या लेखात संपादकीय बदल करताना काय केल्यास काय दिसते ?
संपादन म्हणजे Editing. संपादकीय व्याकरण किंवा संपादकीय बदल म्हणजे शब्द, शब्द-रचना, वाक्ये, वाक्य-रचना, परिच्छेद यात शब्द ठळक (Bold) करणे, शब्द किंवा शब्द-रचनेत लिंक (दुवा) देणे, लेखात फोटो-इमेज जोडणे इ. इ.
Edit (संपादन) हि कळ (लेखाच्या सुरुवातीला, वरती उजव्या हाताला पेनाचे चिन्ह) दाबल्यानंतर संपादन खिडकी ऊघडते. त्यात आपण लिहू शकतो किंवा खालीलप्रमाणे संपादकीय बदल करू शकतो.
विकी किंवा सिटिपीडिया मध्ये खालील तक्ता अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये लेखांची परस्पर जोडणी (Internal Links) कशी करायची आणि बाह्य दुवे (External Link) असे जोडायचे हे स्पष्ट केले आहे.


