समाजाचे देणे मानणारे व्यावसायिक जयंत कुलकर्णी: Difference between revisions

From Citypedia Thane
Th>Yasmin
mNo edit summary
 
m 1 revision imported
 
(No difference)

Latest revision as of 17:30, 30 December 2025

सामाजिक उद्यमी: जयंत कुलकर्णी आणि 'We Need You'

File:Jayantkulkarni.gif

प्रेरणा: कॉर्पोरेट जगातून समाजाच्या हाकेपर्यंत

जयंत कुलकर्णी हे नाव ठाण्याच्या व्यावसायिक आणि सामाजिक जगतात आदराने घेतले जाते. Epicons Consultants Pvt. Ltd. या प्रतिष्ठित स्ट्रक्चरल इंजिनियरिंग क्षेत्रातील कंपनीचे ते संस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीचा पाया अभियांत्रिकी अचूकतेचा आग्रह, व्यवस्थापन कौशल्य आणि प्रामाणिकपणा या मूल्यांवर भक्कमपणे उभा आहे. परंतु, ही ओळख त्यांच्या कार्याची फक्त एक बाजू आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि जीवनाचा खरा केंद्रबिंदू आहे, ‘We Need You’ ह्या संस्थेच्या भरीव सामाजिक कार्यातून त्यांची सामाजिक उत्तरदायित्वाबद्दलची कळकळीची भावना स्पष्ट दिसून येते.

मित्रवर्य अतुल गोरे यांच्या पुढाकारातून जयंत कुलकर्णी, काही व्यावसायिक आणि काही मित्रांनी मिळून अर्थपूर्ण जीवनासाठी समाजासाठी काहीतरी ठोस करत आले पाहिजे, समाजाला काहीतरी परत देण्याच्या निःस्वार्थ भावनेतून ‘We Need You’ या संस्थेची स्थापना केली आणि आपल्या सर्व विश्वस्त सहकाऱ्यांच्या मदतीने समाज ऋण फेडण्याचा एक आदर्श जयंत कुलकर्णी यांनी उभा केला आहे. गेली तब्बल चार दशके ही संस्था ठाणे आणि नवी मुंबई परिसरात अविरतपणे कार्यरत आहे. या प्रदीर्घ काळात चालणारी पूर्व प्राथमिक शाळा, बाल विकास मंदिर, याशिवाय पूरक शिक्षणासाठी आणि स्त्रियांना रोजगारक्षम बनवण्यासाठी, सामाजिक प्रबोधनासाठी अनेक उपक्रम संस्था राबवते.

सामाजिक कार्यात व्यावसायिक दृष्टी

शिक्षण आणि भविष्याची पायाभरणी, आरोग्य व वैद्यकिय सहाय्य, महिला सक्षमीकरण, जाणीव जागृती (कलांना प्रोत्साहन, युथ कट्टा, सत्यशोधक कट्टा), सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार, ह्या उपक्रमांसाठी सामाजिक कार्यासाठी लागणारा वेळ, ऊर्जा आणि स्वतःचा निधी खर्च करण्याची त्यांची तयारी असतेच, पण संस्थेचे काम नियोजनबद्ध रीतीने व्हावे यासाठीही ते आग्रही असतात. "We Need You" (आम्हाला तुमची गरज आहे), हे केवळ घोषवाक्य नाही, तर ते संस्थेचे तत्त्वज्ञान आहे. याचा अर्थ असा की, संस्थेचे कार्य कोणत्याही एका व्यक्तीवर किंवा दात्यावर अवलंबून नाही. ते समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग, प्रत्येक माणसाची मदत आणि समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान आवश्यक मानते. हेच तत्त्वज्ञान या संस्थेच्या चार दशकांच्या सातत्याचे रहस्य आहे.

सामाजिक कार्याचे तत्त्वज्ञान

जयंत कुलकर्णी आणि ‘We Need You’ संस्थेचा प्रवास हा ‘शांतपणे, पण अमूल्य कार्य’ करण्याचा आदर्श आहे. त्यांनी ‘कॉर्पोरेट शिस्त + सामाजिक बांधिलकी = परिवर्तनाची ऊर्जा’ हे समीकरण ठाणे आणि नवी मुंबई परिसरामध्ये जिवंत ठेवले आहे. आज हजारो कुटुंबे, विद्यार्थी, महिला आणि गरजू वर्ग या संस्थेच्या निःस्वार्थ सेवेने उभे राहिले आहेत आणि हेच संस्थेचे सर्वात मोठे यश आहे.

Epicons Consultants Pvt Ltd